जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नितीन पाटील साहेबांना या नियुक्तीबद्दल दिल्या शुभेच्छा
शिवशाही वृत्तसेवा छ.संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण )
कन्नड तालुक्याचे माजी आमदार श्री.नितीनजी पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा 'कार्याध्यक्ष'पदी नियुक्ती करण्यात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना सदरील नियुक्ती पत्र दिले. तसेच याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला.
याप्रसंगी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीप बनकर, शहराध्यक्ष श्री.अभिजीत देशमुख, श्री.संतोष कोल्हे, श्री.महेश उबाळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व तालुक्यातील व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नितीन पाटील साहेबांना या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




