मूकबधिर विद्यालयात शिवजयंतीचा प्रेरणादायी उत्सव

जनहिताय फाउंडेशनचा उपक्रम 

Shiv Jayanti celebrated at Deaf and Mute School, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

हजारमाची (कराड) येथील सदाशिव कॉलनीमधील मूकबधिर विद्यालयात जनहिताय फाउंडेशनच्या वतीने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ नागरिक प्रल्हाद ताटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थितांनी महाराजांना अभिवादन करून त्यांच्या पराक्रम व आदर्शांचे स्मरण केले.

या प्रसंगी विद्यालयातील लहान मुलांना लाडू व चिवडा वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उपस्थित नागरिकांचा उत्साह कार्यक्रमाला विशेष रंगत आणणारा ठरला. 

कार्यक्रमास जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, सदस्य राजेंद्र ताटे, राजू गवार, पोपट केसरे, सागर कोळी, श्रेयस ताटे, आराध्या ताटे, विजय लांडगे तसेच परिसरातील नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !