अद्ययावत ॲक्वा पुरिफायर वॉटर फिल्टरचे उद्घाटन उत्साहात संपन्न

ग्रामस्थांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध

Inauguration of the latest Aqua Purifier water filter, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई तालुक्यातील आसरे येथील रोहिडेश्वर शिक्षण संस्थेच्या कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता डेट वायलर फार्मा पॅकेजिंग इंडिया लि. (केसुर्डी, ता. खंडाळा) व प्लॅनेट वॉटर फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने अद्ययावत ॲक्वा पुरिफायर वॉटर फिल्टरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  चैतन्य कुसुरकर (प्रकल्प व्यवस्थापक, प्लॅनेट वॉटर फाउंडेशन, पुणे) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य  नंदकुमार कोकरे सर (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, नायगाव, ता. खंडाळा) विराजमान होते.

यावेळी उद्योजक  संतोष शेठ अंबवले (वाई), समाजसेवक  आत्माराम सर्जेराव सणस (मुंबई),  संजय जेधे देशमुख (अध्यक्ष, सर्वोदय ट्रस्ट, वाई), शाळेच्या माजी शिक्षिका शेख मॅडम, डॉ. रमेश तायडे, रोहिडेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक  बाबूराव चोरट (भाऊ),  दिनकर दादा सणस,  नारायण दादा सणस (माजी तंटामुक्ती अध्यक्ष, आसरे),  शिवाजीराव धनावडे (माजी सरपंच, दहयाट),  विशाल सणस (सामाजिक कार्यकर्ते),  अंकुश चोरट यांच्यासह ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  प्रकाश जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन  समीर सय्यद सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन  संतोष डगळे यांनी मानले.

या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीत प्राचार्य  नंदकुमार कोकरे सर यांचा अत्यंत मोलाचा वाटा असून सुमारे तेरा लाख रुपये किमतीच्या या अद्ययावत पुरिफायरसाठी आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच  किरण सकटे, प्रकाश गावित, राठोड मॅडम, करवले मॅडम व कु. ऐश्वर्या मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.

हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

       -----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !