शिबिरात ग्रामस्वच्छता, जनजागृती, पर्यावरण संवर्धन,आरोग्यविषयक उपक्रम आशा कार्यक्रमांचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )
कन्नड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय सेवा योजना विभाग, व शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवशीय विशेष शिबिराचा समारोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड येथील कृषी अधिकारी श्री अनिल सिरसाट हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ विजय भोसले प्राचार्य (शिवाजी महाविद्यालय, कन्नड) होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मुक्तार भाई शहा (पंचायत समिती सदस्य, मौजे दाभाडी), मधुकर रावजी अदिक (उपसरपंच, मौजे दाभाडी), अकीलाबी शहा (सरपंच, मौजे दाभाडी), श्री. कचरू शिरसाठ (पोलीस पाटील, मौजे दाभाडी) तसेच अनिल शिरसाट (पत्रकार, मौजे दाभाडी) हिम्मतराव आदिक निवृत्त शिक्षक विकास अधिक डॉ बी के मगर उपप्राचार्य शिवाजी महाविद्यालय कन्नड, श्री बाबूलाल जी काळे माजी अधीक्षक शिवाजी महाविद्यालय कन्नड श्री राजू सोनवणे इत्यादी उपस्थित होते.
श्री अनिल शिरसाठ तालुका कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले की आपण कोणतेही काम जबाबदारीने करावे एखाद्या ठिकाणी पद मिळवले म्हणजे यश नाही त्यात संपूर्ण योगदान देणे म्हणजे खरे यश होय तसेच त्यांनी शेतीच्या विविध योजना सांगून त्याविषयी महाविस्तार ॲप याविषयी माहिती सांगितली
त्यानंतर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मुक्तार भाई शहा यांनी विद्यार्थ्यांना उपदेश करत असताना सांगितले की तुमच्या माध्यमातून आमच्या गावात स्वच्छते विषयीची खूप मोठी संधी मिळाली आहे व आम्हाला खूप काही शिकण्यास मिळाले त्याबद्दल मीच आपला आभारी आहे, आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. विजय भोसले यांनी मत मांडले की गावातील स्वच्छता ही केवळ शिबिरापुरतीच मर्यादित न राहता ती दैनंदिन गरजेचा भाग असावा आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर प्रत्येक गाव हे नक्कीच आदर्श गाव होईल, व शासन दरबारी त्याची दखल घेतल्या जाईल तसेच विद्यार्थ्यांनी वेळोवेळी महाविद्यालयात येऊन प्राध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले,यावेळी शिबिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच लहान मुलांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभागी व विजेत्यांनाही पारितोषिके देण्यात आली.
शिबिराच्या सात दिवसांच्या कालावधीत ग्रामस्वच्छता, जनजागृती, पर्यावरण संवर्धन, आरोग्यविषयक उपक्रम अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी ठोंबरे यांनी केले. प्रास्ताविक सीमा काशीद यांनी मांडले, तर शिबिराच्या सात दिवसांची रूपरेषा साक्षी ठोंबरे यांनी सादर केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कावेरी काळे यांनी केले.समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह, ग्रामस्थांचा सहभाग आणि मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे शिबिर यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव डॉ. सीमा काशीद संयोजन समितीचे सदस्य प्रा.प्रगती चव्हाण, ग्रंथपाल संतोष देशमुख प्राध्यापक सोमेश मोगरे प्रा मदन खुर्दे नानाभाऊ जंजाळ उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस विभागाने विशेष प्रयत्न केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




