जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक मेळावा उत्साहात संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई फुलेनगर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बावधन गट व शेंदूरजण गणाचा आढावा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आजवर राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.
यावेळी अजित पिसाळ (ग्राम सदस्य, व्याहाळी), प्रमोद अनपट, धावडीचे माजी सरपंच, सतिश मांढरे व्याजवाडीचे माजी सरपंच संतोष पिसाळ तसेच मनिषा गाढवे प्रमोद अनपट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन भोसले यांनी केले.
या बैठकीत नागेवाडी धरणाच्या कॅनॉल पोटपाटाचे काम, जललक्ष्मी योजना, लोहारे गावातील तलावाचे विकासकाम, तसेच प्रत्येक भागात पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच मे ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना २०,१२२ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचे, आणि मागील कालावधीतील ३,९०० कोटी रुपयांची प्रलंबित मदत पूर्ण करण्यात आल्याचे नामदार मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, दिलीप बाबा पिसाळ, शशिकांत नाना पवार, उदयसिंह पिसाळ, सतीश मांढरे, विलास मांढरे, शिवाजीराव जमदाडे, विक्रम पिसाळ, राजेंद्र कदम, नितीन अनपट, पप्पू राजे भोसले, अंकुश कुंभार, संतोष पिसाळ, लक्ष्मणराव पिसाळ ,प्रणित पिसाळ राष्ट्रवादी सरचिटणीस प्रताप पवार, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, महादेव मस्कर , मनिषा गाढवे, बाजार समितीचे माजी उपसभापती शंकर शिंदे, बाजार समिती संचालक तुकाराम जेधे, साईनाथ भोसले यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना नामदार मकरंद पाटील यांनी पक्षातील अंतर्गत परिस्थितीवर परखड शब्दांत भूमिका मांडली. ते म्हणाले,
“राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांच्या बंडखोरीमुळे वाई नगर परिषदेला पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात बंडखोरी होणार नाही, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. वाडी-वस्तीवरील प्रत्येक प्रश्न मकरंद पाटलांनीच सोडवायचा का? कार्यकर्त्यांचीही जबाबदारी आहे. जिथे प्रश्न सुटणार नाहीत, तिथे मी स्वतः लक्ष घालीन.”
तसेच त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“बावधन गटाच्या विकासकामांमध्ये ज्यांचा कोणताही संबंध नाही, त्यांनी विकासावर बोलू नये. वाई विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास हा फक्त मकरंद पाटलांनी केला असून बाहेरून येणाऱ्या नेत्यांनी नाही.”
शेवटी, बावधन गट व शेंदूरजण गणातील कार्यकर्त्यांनी गाफील न राहता संघटन मजबूत करावे आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ताकदीने उतरावे, असे आवाहन नामदार मकरंद पाटील यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



