आनंददायी शनिवार या उपक्रमातून वन्यजीवाचे विद्यार्थ्यांना अनुभव
शिवशाही वृत्तसेवा,कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )
आज दिनांक 27 डिसेंबर 2025 शनिवार आनंददायी शनिवार या उपक्रमा च्या माध्यमातून वनविभाग परिक्षेत्र कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना गौताळा अभयारण्य येथे वन्यजीव अभयारण्य विविध जैव संस्कृती, अन्नसाखळी, जंगली प्राण्यांसाठी वन विभागाने केलेली पाण्याची व्यवस्था, इत्यादी पशु पक्षी नैसर्गिक सौंदर्य विविध नैसर्गिक अविष्कार याचे प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतले.
वनविभाग कन्नडचे श्री अरविंद काटकर यांनी विद्यार्थ्यांना अभयारण्य विषयी वनविभाग करीत असलेले कार्य सामाजिक जाणीव मोलाचे मार्गदर्शन केले प्रसंगी विद्यालयाचे हरित सेनेचे प्रमुख श्री पुरुषोत्तम बागुल सर, श्री सुभाष गोरे सर, श्री संजय त्रिभुवन, श्री रामनाथ टेकाळे सर श्री आकाश शिरसाठ, श्रीमती गर्जे इत्यादी सहशिक्षक तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



