अर्ज मागे घेण्याच्या 27 तरखेपर्यत किती जण माघारी घेणार याची उत्सुकता
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून या टप्प्यात दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अभेपुरीचे दिपक काकडे, तर बावधनचे अजय पिसाळ यांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या काही अंशी कमी झाली असली तरी खरी राजकीय चुरस आता अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यात दिसून येणार आहे.
निवडणूक निर्णयानुसार उमेदवारांना दि. 27 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत किती उमेदवार माघार घेणार, कोण आघाड्या-युती ठरणार, तर कुठे बंडखोरी कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्ज छाननीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पक्षांतर्गत बैठका, समेटाचे प्रयत्न आणि संभाव्य माघारीबाबत चर्चा जोर धरत आहे. 27 तारखेनंतर अंतिम उमेदवार यादी स्पष्ट होणार असून त्यानंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोण माघार घेते आणि कोण मैदानात ठाम राहते, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



