नूतन कार्यकारिणीची घोषणा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
डिजिटल युगातील पत्रकारांची ताकद मानल्या जाणाऱ्या 'अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद' संलग्न डिजिटल मीडिया परिषद वाई तालुक्याची नूतन कार्यकारिणी अधीस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांच्या सूचनेनुसार नुकतीच जाहीर करण्यात आली. प्रगती टाइम्स न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री. प्रविण गाडे यांची तालुकाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
अधीस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष श्री. हरीश पाटणे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री. अनिल वाघमारे व राज्य कार्याध्यक्ष संतोष (सनी) शिंदे आणि डिजिटल मीडिया परिषद सातारा यांच्या सूचनेनुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.
वाई तालुक्यातील डिजिटल पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी
अध्यक्ष: प्रविण गाडे (प्रगती टाइम्स न्यूज)
उपाध्यक्ष: संजीव महामुनी (युवा मराठी न्यूज)
कार्याध्यक्ष: प्रविण नवघरे (लोकसंदेश न्यूज)
खजिनदार: सारिका गवते (RPS न्यूज)
सचिव: प्रशांत थोरवे (जनप्रभात न्यूज)
सहसचिव: शुभम कोदे (शिवशाही न्यूज)
या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला मराठी पत्रकार संघ वाई तालुका प्रिंट मीडियाचे अध्यक्ष सचिन ननावरे, धनंजय घोडके, विकास जाधव, बाळासाहेब सणस, विठ्ठल माने, भद्रेश भाटे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे गजानन जाधव यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी जाहीर होताच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मार्गदर्शक श्री. एस. एम. देशमुख, विश्वस्त श्री. किरण नाईक, विश्वस्त श्री. शरद पाबळे, राज्य अध्यक्ष श्री. मिलिंद आष्टीवकर यांसह विभागीय अध्यक्ष हरीश पाटणे, राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे आणि राज्य कार्याध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. वाई तालुक्यातील डिजिटल माध्यमांना न्याय देण्यासाठी आणि पत्रकारांच्या हितासाठी ही टीम सक्षमपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



