‘आनंद नगरी’ उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला
शिवशाही वृत्तसेवा,कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )
श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर, कन्नड येथे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. साबूसिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन व ‘आनंद नगरी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या स्नेहसंमेलनात शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कन्नड–सोयगाव मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सौ. संजनाताई जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कला, क्रीडा व संस्कृती या क्षेत्रांतही प्रावीण्य मिळवावे, असे प्रतिपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली गुणवत्ता अशा उपक्रमांमुळे समाजासमोर येते, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध कवी व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्राध्यापक डॉ. श्री. वीरा राठोड तसेच ज्येष्ठ व्याख्याते श्री. लहाने सर, प्रदीप बोडखे , दीपक दाभाडे , गोरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
्आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, सृजनशीलता व नैतिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी पाहावीत व ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रामदास सुरडकर, सचिव श्री. पांडुरंग राठोड, सहसचिव श्री. संजय पुरी, कोषाध्यक्षा सौ. सरला सोनवणे, संचालक श्री. शिवाजी वाघ, संचालक श्री. मुकुंद शिंदे, मुख्याध्यापक श्री. प्रकाश जिरेमाळी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटिका, समूहगीत, वक्तृत्व, वेशभूषा स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘आनंद नगरी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, हस्तकला व शैक्षणिक साहित्याचे स्टॉल उभारून व्यावसायिक कौशल्याचा अनुभव घेतला. या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. प्रकाश जिरेमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. *विद्यार्थ्याना श्रीम अग्रवाल मॅडम व हर्षद डावरे* यांचे विशेष मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला असून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवी उंची प्राप्त झाली आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



