कोरेगाव-वाठार स्टेशन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
कोरेगाव-वाठार स्टेशन रस्त्याच्या खोदाईनंतर काम बंद ठेवून वाहनधारक व नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शिव समर्थ कंपनीवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा २५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश अनिल उबाळे यांनी दिला आहे.
रस्ता पाच ते दहा फूट खोदून ठेवला असून पावसाळ्यात शेकडो अपघात झाले आहेत. महिला पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या, गर्भवती महिला व वृद्ध नागरिक जखमी झाले, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने खड्डे किती खोल आहेत हेच चालकांना कळत नाही. खडी व चिखलामुळे दररोज अपघात होत आहेत.
सुरक्षेचे कुठलेही उपाय न करता रस्ता उखडून ठेवला असून दिशा फलक, बॅरिकेटिंग, रोड सेफ्टी रिप्लेक्टर बसवलेले नाहीत. कंपनीकडे यंत्रणा नसल्यास पूर्ण रस्ता का खोदला, एक बाजूचा रस्ता सुरू ठेवला असता तर अपघात टळले असते, असा सवाल उबाळे यांनी केला आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिलेल्या निवेदनात “कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाका, अन्यथा नागरिकांचा जीव घेतला जात आहे, जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करा,” अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती मान्यवरांना पाठवण्यात आल्या असून ठिय्या आंदोलन नक्कीच होईल, असा इशारा देण्यात आला आहे
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














