गुणाकांचा सेवाक्रमी कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णया नुसार मुख्यमंत्री महोदयाच्या १५० दिवसाच्या कार्यक्रमांत सेवा विषय बाबीचा गुणाकांचा सेवाक्रमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा विषयक पद्धतीचे मुल्याकंन दि. ६ मे २०२५ ते २ऑक्टोबर करून त्यानुसार वाई नगरपरिषद आस्थापनावरील वर्ग ३ व वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.
शासनांचे स्थायी निर्देश २५ प्रमाणे वाई नगरपरिषदे ठराव क्र. २६ दि. १० जून २०२५ मान्यता दिलेप्रमाणे प्रस्ताव मा. अध्यक्ष जिल्हास्तरीय पदोन्नती समिती सातारा यांचे कडे सादर केले असता या पदोन्नतीचे आदेश दि. १२ ऑगस्ट २०२५ प्रमाणे नगरपरिषदेतील वर्ग ३ मधील २ व वर्ग-४ मधील २ कर्मचारी अशा ४ कर्मचाऱ्यांना मान्यता दिली.
त्याप्रमाणे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी वर्ग ३ मधील लिपीक संवर्ग कर्मचारी नविन भानुदास कांबळे यांना वरिष्ठ लिपीक (सभा कामकाज) श्रीमती. वैशाली दिनकर उघडे यांना वरिष्ठ लिपीक (लेखा विभाग) आणि वर्ग-४ मधील सफाई कर्मचारी उमेश बाळासो कांबळे आरोग्य मुकादम आणि अशिष वसंत लाड आरोग्य मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
वरील कर्मचाऱ्यांना नगरपरिषद सेवेत प्रथमच पदोन्नती मिळाल्या बद्दल त्यांचे नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने मुख्याधिकारी संजीवनी दळवी, कार्यालय अधिक्षक नारायण गोसावी, कर व प्रशासक अधिकार बाळासाहेब कांबळे, कर व प्रशासक सेवा अधिकरी मनोज बारटक्के, कर व प्रशासक सेवा अधिकारी हर्षवर्धन मोहीते, श्रीमती किरण ताटे, आस्थापना विभाग प्रमुख गणेश चव्हाण, सहा. आस्थापना विभाग प्रमुख अनंत भारस्कर, तसेच इतर विभाग प्रमुख यांना या सर्वांचे अभिनंदन केले. व त्यांचे पुढील सेवेच्या कारर्किदीस हार्दीक शुभेच्छा देणेत आल्या. याप्रसंगी सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














