अनेक शरीरसौष्ठवपटूंनचा स्पर्धेत सहभाग
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्हा बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील मानाची 'स्पोर्टिका श्री' स्पर्धा वाई येथील बाजार समिती हॉल येथे नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. स्पोर्टिका फिटनेस क्लब आयोजित या भव्य स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला.
स्पर्धकांनी आपापल्या वजनी गटात उत्तम शरीरप्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी आवश्यक असणारी शिस्त, मेहनत आणि समर्पण स्पर्धकांच्या देहयष्टीतून दिसून आले. स्पर्धेसाठी राज्यभरातील निष्णात परीक्षक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. परीक्षक म्हणून राजेंद्र हेंद्रे, मिथिल भंडारे, अनिल फुले, मुरली वत्स, अजित सांडगे आणि धनंजय चौगुले यांनी स्पर्धकांचे मूल्यांकन केले.
तर मान्यवर म्हणून बाजार समिती संचालक तुकाराम जेधे यांच्यासह उद्योजक संतोष शिंदे, राजेंद्र शिर्के, सोमनाथ देवकुळे, सतिश पिसाळ आणि नवी मुंबईचे उद्योजक शंकर मालुसरे यांची विशेष उपस्थिती लाभली. या स्पर्धेला उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व संतोष शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले. स्पोर्टिका फिटनेस क्लबच्या माध्यमातून संतोष शिंदे हे युवकांना शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात सातत्याने योग्य दिशा आणि मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत, या कार्यामध्ये त्यांना लक्ष्मणासारखी साथ संजय मालुसरे देत आहेत. ज्यामुळे अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे. सातारा जिल्ह्याला शरीरसौष्ठवामध्ये एक नवीन ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने 'स्पोर्टिका श्री' स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली.
दरम्यान संजय चंद्रकांत मालुसरे यांनी गेली दोन वर्षांपासून सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व वाई तालुका शरीर सौष्ठव संघटना यांच्याकडून सातारा जिल्हा शरीर सौष्ठव जिल्हा पंच म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
स्पोर्टिका श्री २०२५ नवोदित या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक यश नायकवडी, द्वितीय किरण पोळ, तृतीय अयान खान, चौथा साहिल थोरवे, पाचवा संजय शिंदे, सहावा क्रमांक अनिकेत भिलारे यांनी यश संपादन केले.
स्पोर्टिका श्री २०२५ मेन्स फिजिक्स कॅटेगीरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुलेमान मोमिन (कराड), द्वितीय आकाश देसाई (कराड), तृतीय सुरज भोसले (फलटण), चौथा नितीन भोसले (वाई), पाचवा प्रशांत फणसे (फलटण), सहावा क्रमांक अनिस शेख (सातारा) यांनी यश संपादन केले.
स्पोर्टिका श्री २०२५ टॉप १५ बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये क्रमशः शंतनु येवले (वाई), राहुल कुसाळकर (फलटण), संजय मोरे (फलटण), अनिरुद्ध पवार (वाई), संतोष वाडेकर (शिरवळ), यश नायकवडी (वाई), रोहित गजरे (कराड), सतीश वाडकर (सातारा), विश्वजित देशमुख (वाई), अजिंक्य महामुनी (वाई), दिनेश पिसाळ (फलटण), गणेश वैरागी (कराड), विनीत नेमाडे (वाई), अभिजित चव्हाण (कोरेगाव) तर उदय शिंदे (वाई) यांनी यश संपादन केले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














