ध्वनी वायु प्रदूषणामुळे नागरिकांना सायलेंट स्ट्रोकचा धोका-श्रीरंग काटेकर.

सातारच्या चौकाचौकात दूषित धुरांचे लोट, यंत्रणेचे दुर्लक्ष

Noise Air Pollution, satara,wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )

सातारच्या चौका चौकात सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत असून यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. वाहतूक कोंडीमुळे दूषित वायूंचे धुरांचे लोटच लोट निर्माण होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित वायू प्रदूषणामुळे नागरिकांना सायलेंट स्ट्रोकचा (पॅरॅलिसिस) धोका निर्माण झाला आहे. विशेषता तरुणाई बरोबरच ज्येष्ठ नागरिकांना हा धोका अधिक जाणवतो. ध्वनी व वायू प्रदूषणाचे शिकार हे ज्येष्ठ नागरिक होत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. यावर संबंधित यंत्रणेने तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. मागील पाच वर्षांपासून सातारा शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे त्यातच शहरातील अरुंद रस्त्याची भर पडली आहे. अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहने यामुळे साताऱ्यात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

 वाहनातून बाहेर पडणारे दूषित धुराचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे विविध आजार मोठ्या प्रमाणात होत असून ध्वनी व वायू प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. विशेषता सातारा शहरातील चांदणी चौक. मोती चौक. देवी चौक. कमानी हौद, पोवई नाका,   गोडोली नाका. शेटे चौक. शनिवार चौक एसटी स्टँड परिसर बॉम्बे रेस्टॉरंट चौक हे प्रदूषणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. येथील प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रशासनाने चौकाचौकातील सिग्नल यंत्रणा सुरू करावेत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

सातारा शहर हे पेन्शनर्स सिटी म्हणून सर्वत्र ओळखले जाते. त्यामुळे या शहरात ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण हे अधिक आहे. तरुणाई बरोबरच ज्येष्ठ नागरिक ही वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. वाढत्या प्रदूषणामुळे ज्येष्ठांचे आरोग्य हे धोक्यात आले आहे आरोग्याच्या अनेक समस्या त्यांना होत असल्याने त्यात ध्वनी व वायू प्रदूषणाने होणाऱ्या आजाराची  भर पडत आहे.

 

साताऱ्यातील हवा गुणवत्ता निर्देशक बनले शोपीस..

वाहनातून बाहेर पडणारा दूषित वायू मोजमापासाठी साताऱ्यात राजवाडा परिसरातील जवाहरलाल नेहरू बाग (गोलबाग) तसेच शाहू स्टेडियम समोर असलेले हुतात्मा चौका नजीक उभारण्यात आलेले हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मोजण्यासाठी व हवा किती स्वच्छ आहे हे दर्शवण्यासाठी उभे केलेले गुणवत्ता निर्देशांक वर वायु प्रदूषणाचे माहितीच उपलब्ध होत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. हे उभारलेले फलक सातारकरांसाठी शोपीस बनले आहेत. सध्या तरी या फलकाचा जाहिरात फलक म्हणूनच उपयोग होत असल्याचे दिसून येते.

 

हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल असणाऱ्या नागरिकांना ध्वनी व वायू प्रदूषणाचा सर्वाधिक धोका जाणवतो. वायु प्रदूषणाचा थेट परिणाम त्यांच्या शरीरावर होऊन त्यांना सायलेंट स्ट्रोकचा (पॅरालिसीस) होऊ शकतो. असे डॉक्टरांचे मत आहे त्याचप्रमाणे सायलेंट स्ट्रोक मुळे मेंदूच्या लहान नसा मध्ये अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे पॅरलिसीसचा धोका अधिक संभवतो. त्याचप्रमाणे हवेतील प्रदूषण कण हे श्वासा द्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात आणि नंतर रक्तप्रवाह द्वारे ते संपूर्ण शरीरात पसरतात त्यामुळे ते मेंदूतील नसांना देखील नुकसान पोहोचवू शकतात असे न्यूरोसर्जन डॉक्टरांचे मत आहे..


---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !