नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा जाहीर सत्कार
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
भाजपा वाई व वाई नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार अमोल मोहिते यांनी अत्यंत कृतज्ञतेने व मनोभावे स्वीकारला.
या सत्कार समारंभास माजी आमदार मदन भोसले, भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा सौ. सुरभी भोसले-चव्हाण, नगरसेवक प्रसाद कृष्णराज बनकर, विजयराव वसंतराव ढेकाणे, संग्राम सपकाळ, सौ. अपर्णा संतोष जमदाडे, सौ. पद्मा संग्राम जाधव-पाडळे, सौ. ज्योती सचिन गांधी, डॉ. सौ. जागृती मकरंद पोरे, सौ. केतकी विजय मोरे, सौ. नूतन गिरीधर मालुसरे, सौ. दिपाली निशिगंध सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच भाजपा व शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते संग्राम जाधव-पाडळे, ज्ञानेश्वर (राजू) सूर्यवंशी पाटील, केशव सूर्यवंशी, उमेश जमदाडे, संजय पाडळे, डॉ. मकरंद पोरे, सचिन गांधी, संतोष जमदाडे, शिवप्रतिष्ठान वाई तालुका प्रमुख सुभेदार गिरीधर मालुसरे (आप्पा), राजेंद्र सदाफुले, सचिन ढगे, निलेश ढगे, सचिन जमदाडे, केदार काटे, सुधर्म उमेश रस्ते, विजय पाटणे, वाई तालुका भाजपा उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढेकाणे, स्वप्निल भिलारे, आदित्य सचिन गांधी, कुंज गांधी, सिद्धार्थ शहा आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अमोल मोहिते यांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



