शिवसेनेचे गजानन पाटील तमलुरे यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर )
नगरपंचायत कार्यालय नायगाव बा. ता. नायगाव (खै.) जि. नांदेड येथे कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी गंधाली पवार हे नगरपंचायत कार्यालयाला आपली खाजगी मालमत्ता समजून जनतेस वागणूक देत आहेत, मुख्याधिकारी जेव्हापासून रुजू झाली तेव्हापासून पंधरा दिवसाला एकदा नगरपंचायत कार्यालयाला फेरफटका मारतात बाकी दिवस घरी बसून नोकरी करतात त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे नगरपंचायत कार्यालयातील कारभारावर त्यांचा अंकुश नाही.
नगरपंचायत मध्ये कुठलीही माहिती मागितल्यास देत नाहीत संबंधित नागरिकांचे फोन घेतल्यानंतर त्यांना नीट बोलत नाहीत अशा कारणांमुळे शिवसेनेचे गजानन पाटील तमलुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे.
नायगाव नगरपंचायत मध्ये राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचारी यांना अंदाजे एक वर्षापासून बसून ठेवून स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व राज्यस्तरीय संवर्गातील कर्मचाऱ्यांचे
पदभार सामान्य लिपिका कडे देऊन एकतर्फी कारभार चालवत आहेत.
त्यामुळे नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्यावर शीस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्याची मागणी शिवसेनेचे गजानन पाटील तमलुरे यांनी आपल्या तक्रारी अर्जात केली आहे...
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



