सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
धोम पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तसेच वेलंग गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व विष्णू बाबुराव काकडे यांची धोम–वेलंग–आसरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
वेलंग व परिसरात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल म्हणून ही निवड म्हणजेच त्यांच्या कार्याचा गौरव असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक सलोखा, सर्वसमावेशक विकास आणि सहकार्याची मूल्ये जपणारे काकडे हे कार्यकर्त्यांमध्ये आदरणीय नाव असून, सोसायटीचा लौकिक व कार्यक्षमता अधिक उंचावण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याच बैठकीत व्हाईस चेअरमनपदी आसरे गावचे माजी सरपंच बबनराव सणस यांचीही निवड करण्यात आली. त्यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे संस्थेच्या कामकाजाला योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली सोसायटी निश्चितच प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या निवडीप्रसंगी संस्थेचे सचिव विक्रम जाधव, माजी चेअरमन संतोष सणस, तसेच निलेश पवार, संदीप जाधव, प्रकाश जाधव, सदाशिव हगवणे, बाळासाहेब जेधे, शंकरराव जेधे, दीपक जेधे, संपतराव सूर्यवंशी, मदन पोळ, अरविंद पोळ, संजय पोळ , रमेश गोळे आदींसह धोम, आसरे व वेलंग गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वाई तालुका शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भिलारे, तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
संस्थेच्या बैठकीत विविध विषयांवरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. या बैठकीस संचालक मंडळातील संतोष सणस, बाळासाहेब साळवेकर, लहू गाडेकर, निलेश पवार, दीपक जेधे, सुरेश जेधे, मदन पोळ, अरविंद पोळ, संजय पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














