देवगाव रोड जवळील पिके धुळे मुळे खराब
शिवशाही वृत्तसेवा वैजापूर ( प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी )
देवगाव ते कायगाव टोका या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून चालू असल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांना व त्यांच्या पिकाचे धुळीपासून खूप नुकसान होत आहे. गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव शेतकरी भानुदास कडुबा गोरे यांनी मिरची पीक घेतले असून मिरची पिकावर धुळीचा संपूर्ण थर आल्याने संपूर्ण पिके खराब झाले . त्यामुळे त्यांनी मोटर चालू करून रोडवर पाणी सोडले .तरी याप्रसंगी शेतकरी म्हणतात मिरची पिकाला 150.000. रुपये खर्च केला.
चार ते पाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे परंतु रोडवरची धूळ उडाल्याने पिकाची वाढ थांबली आहे . तर पिकातून उत्पादन काहीही मिळणार नाही .संबंधित ठेकेदारांनी माझी नुकसान भरपाई द्यावी व पुढील काम लवकरात लवकर उरकून घ्यावे असे मत व्यक्त केले. तसेच सोमनाथ गोरे यांचे रोड टच वांगी पिक धुळीमुळे नष्ट झाले. मंग आता पाणी मारण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी वर्गणी करून कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचे का.. अशी सर्वत्र चर्चा आहे संपूर्ण लासुर ते देवगाव रोड जवळील पिके धुळे मुळे खराब होत आहे.
कृषी भूषण गोरखनाथ गोरे. म्हणतात कि देवगाव ते कायगाव हा प्रशस्त रोड होत असून सर्वांना याचा आनंद आहे .यांनाही रोड जवळ कांदा पिकाची लागवड करायची असून रोडची धूळ उडाल्यामुळे संपूर्ण पिकावर धुळीचा थर येणार आहे .यामुळे पिकाला प्रकाश संश्लेषण क्रियेला अडथळा येऊन पिकाची वाढ थांबेल . म्हणून वेळीच खबरदारी म्हणून तालुक्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत सूचना देऊन रोडवर तीन वेळा पाणी मारण्यासाठी सूचना द्याव्या. उर्वरित रोडचे कामे लवकरात लवकर करून घ्यावे. नसता आम्हा शेतकऱ्यांना रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आणू नका.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














