भुईंज पोलीसात तक्रार दाखल
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
दुचाकी काढण्याच्या किरकोळ कारणावरून वाई तालुक्यातील ओझर्डे येथील एका ३१ वर्षीय तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. नितीन रामदास पिसाळ (वय ३१, रा. ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा) यांनी भुईंज पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडित नितीन पिसाळ यांच्या तक्रारीनुसार, ९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:४५ वाजता जनावरांच्या धारा काढून घरी परतण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी आदित्य शिंदे आणि अभिषेक शिंदे (दोघे रा. ओझर्डे) हे त्यांच्या दुचाकीवरून ऊसाच्या वाड्याचे ओझे घेऊन निघाले होते. त्यावेळी नितीन यांनी गाडी बाजूला काढण्यासाठी दोन मिनिटे थांबायला सांगितल्यावर दोघांनीही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लाथाबुक्क्यांनी पाठीवर आणि पोटावर मारहाण केली.
मारहाण सुरू असताना नितीन यांनी आदित्यच्या वडिलांना (प्रविण शिंदे यांना) फोन करून घटनास्थळी बोलावले. प्रविण शिंदे हे येताच, त्यांनी आदित्य आणि अभिषेक यांच्यासह मिळून नितीन यांना पुन्हा एकदा लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करून निघून गेले. पीडित नितीन पिसाळ यांनी वाई येथील सरकारी दवाखान्यात वैद्यकीय तपासणी करून नंतर भुईंज पोलीस ठाण्यात जाऊन वरील तिघांविरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून घेतली असून अधिक तपास पोलीस हवालदार आर. ए. माने करत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














