अखेर बदला घेतलाच - वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा, आयुष कोमकर याचा गोळ्या घालून खून

गणेशोत्सव काळात पुण्यामध्ये टोळी युद्धाचा भडका

Vanraj andekar, aayush ganesh komkar, Nana peth, Pune, police, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी पारस मुथा)
ऐन गणेशोत्सव काळात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला असून, गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी, त्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा, आयुष कोमकर याचा, शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. 

नाना पेठेतील हमाल तालीमजवळील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पार्किंगमध्ये, त्याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडण्यात आला. त्यात तो मृत्युमुखी पडला. 

या घटनेने पुणे शहर आणि राज्यात खळखळ उडाली असून गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या काळात ही घटना घडली असल्यामुळे पोलीस प्रशासन यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. 

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नाना पेठ येथे अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्याचे विसर्जन सुरळीत पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे असणार आहे.

कोण आहे वनराज आंदेकर?
वर्षभरापूर्वीच वनराज आंदेकर यांची सप्टेंबर २०२४ मध्ये नाना पेठेत हत्या करण्यात आली होती. वनराज आंदेकर हे 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आले होते. 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते. त्याआधी वनराजची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या. 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं. तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते. वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !