वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय • आता पर्यंत ८६५ सभासदांची नोंद
शिवशाही वृत्तसेवा, वाई, ( प्रतिनिधी शुभम कोदे )
तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम, वेलंग, आसरे या तीन गावांची एकत्रित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था असलेल्या धोम सोसायटीने यंदा सभासदांना ७ टक्के लाभांश जाहीर केला आहे. संस्थेचे चेअरमन संतोष सणस यांनी ही माहिती दिली.
संस्थेची ८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी धोम येथील संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तीन गावांतील व वाड्यांमधील मिळून संस्थेचे ८६५ शेतकरी सभासद असून, संस्थेची उलाढाल ६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
चालू आर्थिक वर्षात संस्थेने दोन मजली आरसीसी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून, लवकरच तिचे उद्घाटन मंत्री ना. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितिन पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावर्षी संचालक मंडळाने स्वखर्चातून आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन केले असून, त्यामध्ये संस्थेच्या विविध कर्ज योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.
सभेत जिल्हा बँकेचे विकास अधिकारी अमोल सोनावणे यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या कर्ज व विमा योजनांची माहिती दिली.
सभेस उपाध्यक्ष मदन पोळ, संचालक निलेश पवार, बबन सणस, विष्णू काकडे, बाळकृष्ण साळेकर, सुरेश जेधे, लहू गाडेकर, गोरख शेरे, दीपक जेधे, संजय पोळ, सभासद अरविंद पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिव विक्रम जाधव यांनी मानले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














