पंढरीत आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उसळला जनसागर

५२ जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षाव आणि क्रेनच्य सहाय्याने भला मोठा हार

mla abhijit patil, birthday, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

शुभेच्छा देण्यासाठी जिल्हयातील अनेक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींनीची उपस्थीती

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदारसंघाचे आ. अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे  वाढदिवस मोठा जल्लोष संपन्न झाला. 

विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने ५२जेसीबीतून फुलांची उधळण करत क्रेनचा मोठा हार आ. पाटील यांना कार्यकर्त्यांच्या वतीने घालून वाढदिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी आशीर्वाद देण्यासाठी आलेले ह.भ.प.ज्ञानेश्वर जळगावकर महाराज म्हणाले की; अभिजीत पाटील याचे सर्वच क्षेत्रात मोठं कार्य उभा आहे. ज्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केलं त्यांचा आशीर्वाद आमदार पाटील यांच्या कुटुंबाला मिळालेला आहे. अगदी कमी वेळात जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात स्वतःची स्वकर्तुत्वावर ओळख निर्माण करणारे आ.अभिजीत पाटील आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अधिवेशनात मांडून आमदार अभिजीत पाटील हे लोकप्रिय बनलेले आहेत. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

वाढदिवसानिमित आयोजित सत्काराला उत्तर देताना आ. पाटील म्हणाले की; मागील वाढदिवसाचे वेळी काही जणांनी आमच्यावर टीका टीपणी केली .स्वतः जेसीबी आणायचा स्वतःच फुल उधळून घ्यायची .परंतु तुम्हाला माणसं कुठून येणार? हा प्रश्न तुमच्यासमोर आहे. मात्र मी माझ्या जिवाभावाची माणसं जोडलेली आहेत. त्यांच्याच जोरावर मतदाररूपी आर्शीवाद देऊन ,आज विधानसभेमध्ये निवडून आलो आहे.त्यामूळे तुम्ही सर्वांनी मला निवडून दिले असताना, विधानभवनात पहिल्यांदा जात असताना, विधानसभेच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून, मंदिराप्रमाणे प्रवेश केला. तीन अधिवेशनामध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये पंचावन्न, दुसर्‍या अधिवेशनात साठ तर पावसाळी अधिवेशनात एकशे सतरा प्रश्न विचारले असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडले. त्या जोरावर तालिकाध्यक्ष पदावर देखील कामकाज पाहण्याची संधी मिळाली.

मागील वाढदिवसाला चार महिन्यात आमदार होतो म्हणून सांगितलं परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं. म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते. अशी खोचक टीकाही आ. पाटील यांनी केली..

यावेळी प्रस्ताविक प्रा.तुकाराम मस्के सर यांनी केले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे, अनिल सावंत, माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, राहुल शहा, डॉ.बी.पी रोंगे सर,  विठ्ठल कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलाताई रोंगे, बालाजी मलपे, अरूण कोळी, सतीश शिंदे, किरण घाडगे, धनंजय कोताळकर, प्रशांत शिंदे, श्रीनिवास बोरगावकर, राहुल साबळे, राजन थोरात, महादेव धोत्रे, आदित्य फत्तेपुरकर, देवानंद गुंड पाटील, सुधीर भोसले, दिगंबर सुडके, सतीश चव्हाण, प्रथमेश पाटील, अमर सुर्यवंशी, मदनसिंह पाटील, युवती अध्यक्ष चारुशीला कुलकर्णी, अनिता पवार, सावली बंगाळे यासह विठ्ठल कारखान्याचे संचालक मंडळ, पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !