श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शिवशाही महारत्न पुरस्कारांचे थाटात वितरण
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
शिवशाही न्यूज वर्धापन दिन उत्साहात साजरा
अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्क चा तिसरा वर्धापन दिन आणि शिवशाही महारत्न पुरस्कार वितरण सोहळा, पंढरपूर येथील योग भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई जयकुमार गोरे या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या तर ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजमाने अध्यक्षस्थानी होते. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे, आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले बंधू माजी सभापती सोमनाथ अवताडे, आमदार अभिजीत पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले त्यांचे बंधू आनंद पाटील, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे समर्थ फक्त पु.व. कुलकर्णी गुरुजी, पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष महबूब सय्यद, उद्योगपती अनिल इंगवले, उद्योगपती मुनागीर गोसावी, शिवशाही न्यूज चे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी, कार्यकारी संपादक सौ मनीषा कुलकर्णी, समाजसेविका चंदना येळे, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
वारकरी सांप्रदायिक गंध लावून आणि औक्षण करून करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री विठ्ठल तसेच विश्वातील प्रथम पत्रकार देवर्षी नारद, आधी मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शिवशाही न्यूज परिवाराच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात समाज हिताचे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अजय तापकिरे यांना अभिनय कला, शरद पवळे यांना सामाजिक, प्रवीण शिशुपाल फाउंडेशनला सामाजिक आरोग्य व शैक्षणिक, रुंदादेवी मुन्नागीर गोसावी यांना वीर माता, जयश्रीताई धनंजय पाटील यांना आदर्श माता, अनिल इंगवले यांना उद्योग, सिद्धार्थ ढवळे यांना पत्रकारिता, अश्विन कडलास्कर यांना शिवकालीन क्रीडा दांडपट्टा, उद्धव कौलगे यांना कृषी, संतोष लवटे यांना ज्योतिष व वास्तुशास्त्र, डॉक्टर शितल शहा यांना वैद्यकीय, सचिन पाटील यांना धर्माचरण व इतिहास जागृती, नंदकुमार राऊत व शिवाजी शिंदे यांना साहित्य, दशरथ पाटील यांना पोलीस सेवा, सुनील वाळुंजकर यांना प्रशासकीय सेवा, सेवा विठ्ठल चरणांशी समाज प्रबोधन लघुपट, निखिल जाधव यांना संशोधन, बंडू पवार यांना व्यसनमुक्ती व मराठा आंदोलन, रेखाकिशोरी टाक यांना हस्तरेषा व प्राचीन विद्या, मनोज मोकाशे यांना वक्तृत्व व समाज जागृती, तर इक्बाल शेख, अमोल महानवर, फैजल पठाण, शुभम कोदे, तातेराव बनसोडे, आणि पायल गांधीयांना डिजिटल मीडिया पत्रकारिता विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.
"शिवशाही न्यूज हे प्रामाणिक आणि पारदर्शक काम करत असून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करेल यात शंका नाही" अशा शब्दात मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई यांनी शिवशाही न्यूजच्या कामाचे कौतुक केले.
तर पत्रकारीतेमध्ये आवश्यक असणारे सातत्य सचोटी आणि चिकाटी हे गुण संपादक सचिन कुलकर्णी यांच्या अंगी असल्यामुळे शिवशाही न्यूज दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहे. असे गौरव उद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणात राजा माने यांनी काढले.
आमदार अभिजीत पाटील यांचे बंधू आनंद पाटील, विठ्ठल कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेम लता रोंगे,पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष महबूब सय्यद, समर्थ भक्त पु व कुलकर्णी गुरुजी, सुप्रसिद्ध फोटोग्राफर बशीर शेख, कन्नड येथून आलेले प्राध्यापक मनोज मोकाशी, पुरस्काराचे मानकरी चित्रपट अभिनेते अजय तपकिरे या मान्यवरांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त करताना शिवशाही न्यूज नेटवर्कचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक सचिन कुलकर्णी यांनी केले तर कार्यकारी संपादक सौ मनीषा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश खिस्ते प्रवीण नागणे रवी सोनार राजकुमार शहापूरकर अजित देशपांडे तानाजी जाधव, महेश कुलकर्णी, गोविंद आढाव, भक्ती दामोदर, प्रीती कुलकर्णी, प्रज्ञा बारस्कर, मोनिका कुलकर्णी, बिपिन कुलकर्णी, कबीर देवकुळे, यांच्यासह शिवशाही परिवाराचे सर्व सदस्य प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व इतर सर्व घटकातील राज्यभरातील मान्यवर उपस्थित होते.
---------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा