शाही स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट नगरी वाई येथे आज श्रावणी सोमवारनिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील विविध जिल्ह्यांतील आणि गावांतील नागरिकांनी आपल्या गावातील पालख्या, ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत महागणपती मंदिर परिसरात मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली.
श्रावणी सोमवार आणि शाही स्नान यांचा योग जुळून आल्यामुळे महागणपती मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. माता-भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. पारंपरिक पोशाख, वेशभूषा आणि भक्तिरसात न्हालेली पालखी मिरवणूक संपूर्ण वाई शहराला भक्तिमय रंगात रंगवून गेली.
याचवेळी पश्चिम भागामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम बलकवडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळे महागणपती मंदिराला पाणी लागले आहे त्यामुळे भावीकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गगनात भिडणारा भाविकांचा आनंद, जल्लोष आणि "चांगभलं चांगभलं" च्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
अनेक भाविकांनी शाही स्नानाचा आनंद घेत पारंपरिक पद्धतीने श्रावणी सोमवार साजरा केला. हा धार्मिक उत्सव, भक्तिभावाने ओथंबलेली गर्दी आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा संगम वाई नगरीत पहायला मिळाला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा