सोहळ्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
शिवसेना वाई विधानसभा प्रमुख विकास अण्णा शिंदे याच्या वतिने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात व पारंपरिक थाटात संपन्न झाले . सामाजिक ऐक्य, उत्सवप्रियता आणि पारंपरिक संस्कृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
या भव्य कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक लोकनेते बापूसाहेब शिंदे, TNT Infrastructure चे सर्वेसर्वा शिवराम थोरवे (तात्या), शिवसेना नेते नेते विकास शिंदे, तालुका प्रमुख रवींद्र भिलारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व युवासेना नेते प्रणव थोरवे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख रणजीत भोसले, राजू केजळें, डॉ. नितीन सावंत, अभिषेक यादव, हर्षवर्धन खामकर, किरण खामकर,संतोष शेठ शिंदे, सचिन मानकुंबरे, किरण घाडगे, रामा भिसे, सागर शिंदे व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता नितीन चोरट सोपान चिकणे, दत्ता पोळ, बबलूभाई मुलानी, धनंजय चव्हाण, रवींद्र मोझर सागर शिंदे सचिन शिंदे राम गायकवाड पश्चिम भागातील अनेक मान्यवर शिवसैनिक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिंदे यांचे जवळचे दिवंगत सदस्यांना काही शिवसैनिक यांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली . हा क्षण उपस्थित सर्वांना भावूक करणारा होता.
हंडी फोडण्याचा मान
सिद्धेश्वर क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ, सिद्धनाथ वाडी यांनी उत्कृष्ट समन्वय व चिवटपणे दहीहंडी फोडत उपस्थितांची मने जिंकली. ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले या यशस्वी आयोजनाबद्दल विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा