22 ऑगस्ट रोजी होणार प्रसिध्द - उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण
शिवशाही वृत्तसेवा, सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दि.१२ ऑगस्ट २०२५च्या आदेशानुसार प्रभाग रचनेस अंतिम मान्यता देण्याबाबत दिलेल्या सुचनानुसार विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या अंतिम प्रभाग रचनेस दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी मान्यता दिलेली आहे.
त्याअनुशंगाने सातारा जिल्हा परिषद निवडणूक विभाग व ११ पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना दि.२२ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सातारा जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ satara.nic.in वर सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेले आहे. असे उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी कळविले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














