उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव नियम पाळून साजरा करावा, जे मंडळ डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर करून आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा शब्दात वाईचे डी. वाय. एस.पी. बाळासाहेब भालचिम यांनी कडक सुचना दिल्या. वाई पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, नायब तहसीलदार धनश्री यादव , महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश कोळी, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव, पालिका बांधकाम अभियंता अनंत प्रभुणे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक मंडळाची पोलिसात नोंद होणं गरजेची आहे. त्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. समाजाच्या भावना दुखावतील अशी वर्तणूक, देखावे नको, वीज कनेक्शनसाठी महावितरणची परवानगी आवश्यक आहे, प्रत्येक मंडळास वेळेचे, आवाजाचे बंधन राहील, आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, लोकोपयोगी, सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन ही त्यांनी केले. तसेच काही ग्रामपंचायतींनी डॉल्बी वर बहिष्कार घातला आहे त्यांचे अनुकरण करावे, गुन्हेगारी प्रवृत्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच इतर आवश्यक परवानग्यानंतरच पोलिसांकडून परवानगी देण्यात येईल, पोलिसांकडून घेण्यात येणाऱ्या गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम तीन मंडळंना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल, अशा सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिवंत देखव्यासाठी वेळ वाढवून मिळावी, मिरवणूकीदिवशी रस्त्यावरील बंद वाहने काढण्याची विनंती प्रशासनाकडे केली.
मंडळानी डिझेलचा ज्वलनशील पदार्थांचा साठा करू नका, दारू पिणारे आढळ्यास गुन्हा दाखल करणार, डॉल्बी वाजल्यास मंडळाचे रेजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल. डेकोरेशनची उंची विद्युत पुरवठा्यास अडथळा नसावा. पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बसावा. गणपती उत्सवात ईदचा सण आहे. तरी कायदा सुव्यवस्थेची परस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेणे.
जितेंद्र शहाणे
पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














