घोषवाक्य व निबंध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सहकाराचा प्रचार प्रसार आणि उद्धार करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि, शाहूनगर, शेंद्रे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या 'सहकार' या विषयावरील स्लोगन (घोषवाक्य ) आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
अजिंक्य उद्योग समूहाचे नेते, साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक श्री. जिवाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने 'सहकार' या विषयावर अधिकारी-कामगारवर्ग यांच्यासाठी स्लोगन (घोषवाक्य ) स्पर्धा तसेच अजिंक्यतारा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती लेबर ऑफिसर ऍड. रणजित चव्हाण यांनी दिली.
या स्पर्धेतील विजेत्यांना सेक्रेटरी बशीर संदे, कार्यालय अधीक्षक सयाजी पाटील, प्रोडक्शन मॅनेजर सुरेश धायगुडे, वर्क्स मॅनेजर रणजित पोळ, चिफ अकॉउंटन्ट प्रविण जाधव, सिव्हिल इंजिनियर शिवाजी थोरात, लेबर ऑफिसर ऍड. रणजित चव्हाण, डिस्टलरी मॅनेजर दिनेश चव्हाण, गार्डन विभाग प्रमुख प्रविण जाधव यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
सहकारामुळे लोकांमध्ये सामाजिक ऐक्य आणि सलोखा वाढतो. एकत्र काम केल्याने सामाजिक विकास साधला जातो. 'सहकारातून समृद्धीकडे' हा मुलमंत्र विद्यार्थीदशेतच रुजवा या उद्देशातूनच शालेय निबंध स्पर्धाचे तसेच सहकारचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे या हेतूने अधिकारी-कामगारवर्ग यांच्यासाठी स्लोगन (घोषवाक्य ) स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजिंक्यतारा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री. संतोष मोरे, मुख्याध्यापक श्री. शंकर पवार व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. अशी माहिती लेबर ऑफिसर ऍड. रणजित चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली.
स्लोगन (घोषवाक्य ) स्पर्धा विजेते
प्रथम क्रमांक - राहुल दिनकरराव लोखंडे ,( प्रशासन विभाग ) रु. १०००/- रोख
सहकाराच्या मूलतत्त्वांचे आचरण करू गाव पातळी बरोबर देशाचाही विकास करु
द्वितीय क्रमांक - महेंद्र (आबा )एकनाथ जाधव ,
(प्रसिद्धी प्रमुख व व्यस्थापक सांस्कृतिक विभाग ) रु. ७५०/- रोख
चला..सहकारात कृत्रिम बुद्धिमत्ता (A I) साकारू, नवसमृद्धीकडे वाटचाल करू..!
तृतीय क्रमांक - निलेश श्रीकांत जाधव ,
(अकौंट विभाग ) रु. ५००/- रोख ,
सहकार रुजवू तळागाळात, समृद्धी आणू जना मनात
उत्तेजनार्थ- महेश सीताराम हुमणे
(संगणक विभाग) ३०० रोख
सहकारामध्ये नवे तंत्र, हाच सहकार वाढीचा खरा मंत्र..!
सचिन प्रदीप यादव
(लेबर अँड वेलफेअर ) ३०० रोख पारितोषिक
सहकाराची आस, रोजगार हमखास
विजय आधार पाटील
(डिस्टीलरी विभाग) ३०० रोख
लावू रोपटे सहकाराचे, वटवृक्ष होईल विकासाचे
निबंध स्पर्धा बक्षीस विजेते
गट १ ते ४थी
ओवी बिपीन फणसे -प्रथम - रु.७५०/- रोख
स्वरागिणी अमोल भोसले - व्दितीय रु.५००/-रोख
ऋग्वेद दिनेश नेहरकर - तृतीय रु.३००/-रोख
श्रेया विनोद कदम - उत्तेजनार्थ रु.१००/-रोख
गट इ. ५ वी ते ७ वी
हर्षदा विजय जाधव - प्रथम रु.७५०/-रोख
स्वयम दियक फडतरे - व्दितीय रु.५००/-रोख
विजया प्रसाद क्षीरसागर तृतीय रु.३००/-रोख
परिणिती नितिन शिंदे - उत्तेजनार्थ रु. १००/-रोख
गट इ. ८ वी ते १० वी
नमिता श्रीमंत जाधव - प्रथम रु. ७५०/-रोख
सिद्धी अजय पडवळ - व्दितीय रु. ५००/-रोख
वैष्णवी संतोष माने - तृतीय रु ३००/-रोख
प्रांजली गणेश कदम - उत्तेजनार्थ रु. १००/-रोख
गट इ. ११ वी ते १२ वी
नम्रता संतोष माने - प्रथम रु. ७५०/-रोख
आदिती अरविंद पोतेकर - व्दितीय रु. ५००/-रोख
नयंतिका खेडेराव शेळके - तृतीय रु. ३००/-रोख
अंकिता सूर्यकांत मोहिते - उत्तेजनार्थ रु. १००/-रोख
या पारितोषिक वितरण कार्यक्रमास पर्यावरण विभाग प्रमुख बी. डी. पोवार , सॅनिटेशन विभाग प्रमुख संजीवन कदम, सरपंच व इंधन विभागप्रमुख कृष्णा कांबळे, स्टोअर विभाग प्रमुख गाडे, केनयार्ड विभाग प्रमुख प्रमोद कुंभार, कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी, माजी कामगार संचालक नितीन भोसले, सुरेशदादा साबळे, प्रशासन विभागाच्या सहकारी व पतसंस्थेच्या संचालिका सौ.आरती भंडारे, सौ. रेश्मा काळे, सौ. सुप्रिया देशमुख, शिक्षक वर्ग आदी मान्यवरांसह कामगार बंधू-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा