क्रेशरकडे जाणाऱ्या बेकायदेशीर रस्त्याचे काम गावकऱ्यांनी बंद पाडले
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
शासनाचा कोणताही आदेश नाही जलसंधारण विभाग किंवा पाचगणी पाणीपुरवठा यांच्याकडून कोणतेही पत्र नाही मात्र तरीही गुंडशाही आणि बळाच्या जोरावर क्रेशर मालक यांनी जेसीबीच्या साह्याने क्रेशरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. पाचगणी पाणीपुरवठा यांनी अधिग्रहण केलेल्या क्षेत्रांमध्ये आपल्या खाजगी पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न आज कुसगाव पार्टेवाडा या परिसरातील शेतकऱ्यांनी हाणून पाडला. पाचगणी पाणीपुरवठा व आमच्यामध्ये अद्यापही चतुर सीमा निश्चित झालेल्या नाहीत आणि या ठिकाणी आमचे क्षेत्र निश्चित झाल्यानंतर आमची मान्यता घेऊन या ठिकाणी रस्त्याचे काम करण्याचा अधिकार हा फक्त पाचगणी पाणीपुरवठा यांना असल्याचे सांगत बेकायदेशीर पद्धतीने सुरू असणाऱ्या क्रशर मालक यांच्या रस्त्याचे काम आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हाणून पाडले.
पोलीस प्रशासनाच्या समोरच या सर्व गोष्टी झाल्या व संबंधित शेतकरी यांनी तुम्हाला शासनाच्या कोणत्या विभागाने या ठिकाणी रस्ता करण्याचा कायदेशीर आदेश दिला आहे तो दाखवा असे सांगितल्यावर त्यावर क्रशर मालक व त्यांच्या प्रतिनिधींकडून कोणत्याही स्वरूपाचे उत्तर आले नाही यामुळे त्या ठिकाणी क्रशर मालक यांचे बळजबरीने सुरू असणारे बेकायदेशीर काम थांबवण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.
पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत संबंधित रस्त्याचे काम त्या ठिकाणी थांबवले व प्रकरण चिघळणार नाही याची दक्षता घेतली. मात्र या सर्व गोष्टींमुळे हे आंदोलन पुन्हा एकदा चिघळण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा