शेतात लावलेली सुमारे एक लाख किंमतीची स्टाॅबेरीची रोपे अज्ञात चोरट्यांनी नेली चोरुन

स्टाॅबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

Theft of strawberry plants , wai ,satara , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

ओझर्डे ता.वाई येथे शेतात लावलेली सुमारे एक लाख किंमतीची स्टाॅबेरीची रोपे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली आहेत. ओझर्डे परीसरात होणाऱ्या चो-यांच्या प्रमाणामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण  आहे. 

पाचगणी महाबळेश्वर येथील स्टाॅबेरी उत्पादक शेतकरी वाई तालुक्यातील ओझर्डेगावासह विविध गावात खंडाने शेतजमिनी घेऊन विविध प्रकारचे स्टाॅबेरी रोपांची लागवड लागवड करीत असतात. मे/जून महिन्याच्या दरम्यान ही रोपे लावली जातात.व ऑक्टोबर महिन्यात ही लावणीस तयार झालेली रोपे पिशवीत भरून लागवडीसाठी नेली जातात. 

त्याचपध्दतीने पाचगणी भिलार येथील महेंद्र भिलारे वय ३६ यांनी ओझर्डे येथील सोनेश्वर रोड शिवारात सुमारे एक एकर क्षेत्रावर लेअर जातीचे मदर पॅ्ल्ट लावले होते.त्यावर सुमारे एक लाख रुपये खर्च केला होता.सद्या एक महिन्याच्या अंतराने ही रोपे काढण्यास तयार झाली असती तयार होण्यापूर्वीच चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या घटनेमुळे ओझर्डे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या सुमारास शेतात येऊन स्ट्रॉबेरी रोपांची व अन्य पिकांची चोरी करणे, ही गंभीर बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !