आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बोलावले भेटीला - सविस्तर चर्चा करून प्रकरण घेतले समजून
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आंदोलनाच्या १९ व्या दिवशी क्रशर विरोधी लॉन्ग मार्च मधील आंदोलकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी भेटीला बोलावले.
कुसगाव पासून मंत्रालयाच्या दिशेने शेतकऱ्यांचा लॉंग मार्च जवळपास २५० किलोमीटरचे अंतर कापून पायी चालत येत असल्याची माहिती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज साहेबांना मिळाली.
आजच्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर आपल्या अधिकारांसाठी पायी चालत येण्याची वेळ शासनाने आणल्याची भावना साहेबांनी व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांसाठी विशेष वेळ देत संपूर्ण प्रकरण त्यांनी समजून घेतले आहे व या प्रकरणी आपल्या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी यांनी का लक्ष घातले नाही असा सवाल त्यांनी आंदोलनकर्त्यांना विचारला.
मागच्या १९ दिवसांपासून जिल्हा प्रशासन असो लोक प्रतिनिधी कोणीही आमची दखल घेतली नाही असा टाहो आंदोलनकर्त्या महिलांनी राज साहेब ठाकरे यांच्यासमोर मांडला.
आपण आपले आंदोलन थांबवू नका ते सुरूच ठेवा मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो व वेळ पडल्यास या प्रकरणी एक मोठे आंदोलन उभे करण्यासंदर्भात सूचना त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे बेकायदेशीर दगड खाणीचे हे प्रकरण येणाऱ्या काळामध्ये मोठे रुद्र रूप घेईल व या मागे नक्की कोणाचा चेहरा आहे हे लवकरच जनतेसमोर येईल अशी शक्यता आज राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जात आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा