नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे घराघरात पारायण होणे गरजेचे - श्री टेंबे स्वामी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)सदगुरू नारायण महाराज उर्फ आण्णांनी नारायण ज्ञानबोध या ग्रंथातून मानव जातीला दिलेला संस्कारांचा ठेवा विचारांची शिकवण म्हणजेच माणसातील माणूस जागा करण्याची चळवळ असून तिचे पारायण होणे चिंतन होणे म्हणजेच आपल्या घराघरातील कुटुंब व्यवस्था सुदृढ करून सुसंस्कारीत करणे होय असे प्रतिपादन श्री क्षेत्र नारायणपूरचे उत्तराधिकारी श्री टेंबे स्वामी यांनी केले.
भुईज ता. वाई येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या प्राचीन महर्षी आचार्य भृंगऋषी महाराज यांच्या आश्रमात विश्वचैतन्य सदगुरू श्री. नारायण महाराज यांनी लिहीलेल्या नारायण ज्ञानबोध या ग्रंथाचे सामुदायिक पारायण फक्त महिला सेवेकरी यांच्यावतीने सुरू आहे. त्यास सदिच्छा भेट व आशिर्वादपर प्रवचन करताना सद्गुरू श्री. टेंबे स्वामी बोलत होते. यावेळी विशेष उपस्थिती संस्थानचे विश्वस्त भरतनाना क्षीरसागर होते.
यावेळी बोलताना टेंबे स्वामी महाराज पुढे म्हणाले की नारायण ज्ञानबोध या ग्रंथाचे पारायण व ते हि कृष्णानदीच्या काठी असलेल्या भृगुऋषि मठात होत असल्याने या नगरीत ख-या अर्थाने चैतन्य नव्याने वाढले आहे. इथली पुण्यभूमी व सद्गुरू आण्णांनी जिर्णोध्दारीत केलेली भृंगऋषी महाराजांची तपोभूमी यामुळे येणा-या पिढयांना हा संस्कारांचा ठेवा उपयुक्त ठरणार आहे असे सांगून माणसातील माणूस जागा करणे हेच खरे आद्यात्मिक कार्य होय. त्याची साधना व जपणूक सर्वांनी करू या असे हि यावेळी म्हणाले.
प्रारंभी सर्व उपस्थित महिला वाचकांच्यावतीने सद्गुरू श्री टेंबे स्वामी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच अर्जुननाना भोसले, विद्यमान सरपंच विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार, देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक गजानन भोसले, उद्योगपती रामभाऊ वारागडे, रामदास जाधव, जगन्नाथ दगडे, पांडुरंग शेवते आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सद्गुरू आण्णांच्या लेकी ग्रुपच्यावतीने सौ राजश्री भोसले पाटील यांनी केले. सुत्र संचालन जयवंत पिसाळ यांनी केले प्रल्हाद जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा