छत्रपती शिवरायांचा वारसा जपणाऱ्यांची भीती नक्की कुणाला?
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे)
शिवकालीन गडकोट संवर्धन मोहिमेच्या अनुषंगाने पारनेर मतदारसंघाचे खा. निलेश लंके, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहित पवार आणि सर्व मावळ्यांच्या स्वागताचा लावलेला फ्लेक्स बोर्ड अज्ञात व्यक्तीने फाडला.
वाई येथील सह्याद्रीनगर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे डॉ. नितीन सावंत यांच्या समर्थकांसह शिवप्रेमीमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. खा. निलेश लंके यांच्या विचारातून उभी राहिलेली ही संकल्पना मूर्तरूप घेत असतानाच रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी प्रतापगड येथे आपला मावळा प्रतिष्ठान यांच्याकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.
याआधीही महाराष्ट्रातील श्री रायरेश्वर, श्री धर्मवीरगड, श्री शिवनेरी अशा अनेक गडकोटांवर जाऊन खा. निलेश लंके यांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे. यावेळी वाई विधानसभा मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचा असणारा किल्ला म्हणजे किल्ले प्रतापगड याची निवड करण्यात आली.
या अनुषंगाने मोहिमेसाठी येणाऱ्या सर्व मावळ्यांच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड वाई शहरात डॉ. नितीन सावंत, संतोष दादा शिंदे आणि शिवप्रेमी यांच्या माध्यमातून लावण्यात आले, मात्र सह्याद्रीनगर येथील फ्लेक्स बोर्ड रातोरात फाडण्यात आला. नक्की याबाबतीत कुणाचं पित्त उसळलं असा सवाल डॉ. नितीन सावंत यांच्या समर्थकांसह शिवप्रेमींकडून केला जात आहे.
वाई तालुक्यातील डॉ. नितीन सावंत यांच्या समर्थकांनी तसेच शिवप्रेमींनी वाई शहरात या मोहिमेसाठी येणाऱ्यांच्या स्वागताचे फ्लेक्स बोर्ड लावले होते. तसेच सह्याद्रीनगर चौक येथेही बोर्ड लावण्यात आला होता. मात्र, कोणीतरी अज्ञाताने गुरुवारी मध्यरात्री हा बोर्ड फाडल्याने शिवप्रेमींसह डॉ. नितीन सावंत यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच समर्थक घटनास्थळी व नंतर वाई पोलीस स्टेशनला दाखल झाले. यावेळी फ्लेक्स बोर्ड फाडलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समस्त शिवप्रेमी तसेच डॉ. सावंत यांच्या समर्थकांनी केली आहे. स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य केल्याचे समर्थकांमधून बोलले जात आहे. मात्र छ. शिवरायांचा वारसा जपणाऱ्यांची भीती नक्की कुणाला? असा सवालही शिवप्रेमींकडून उपस्थित केला जातोय.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा