सातारा जिल्ह्यातील सर्व गोशाळांची बैठक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र शासन गोसेवा आयोग व गोशाळा महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील सर्व गोशाळांची बैठक सातारा पशुसंवर्धन कार्यालयात आयोजित करण्यात आले होती. या बैठकीत पशुसंवर्धन आयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी करुणा मंदिर गोशाळेचे कार्य गौरवास्पद असून इतर गोशाळेंनी देखील करुणा मंदिरच्या कार्याचा, अनुभवाचे मार्गदर्शन घेतल्यास आपल्या गोशाळा देखील उत्तम रित्या कार्यरत करण्यासाठी उपयोग होईल. असे म्हटले आहे.
यावेळी गोशाळा महासंघाचे व महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर सुनील सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी शासनाकडे नोंद असलेल्या गोशाळांना सर्टिफिकेट, व रजिस्टर देण्यात आले. डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी यावेळी गोशाळेंच्या विविध समस्या, अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी साताऱ्यातील गोशाळेचे संचालक गोरक्षक व पश्चिम महाराष्ट्र सनातन रक्षक संचलित गोरक्षक सेनाचे प्रमुख व करुणा मंदिर ग शाळेचे व्यवस्थापक विवेक भिडे उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा