सकल मराठा समाज पुन्हा एकवटला
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर आगेकुच करण्यासाठी आज वाई येथे सकल मराठा समाजातर्फे नियोजनाची बैठक पार पडली. मुंबई येथे जाण्याकरता प्रत्येक गावातून दोन गाड्या येणे अपेक्षित असल्याचेही या या बैठकीत निर्णय घेण्यात आला व 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता वाई येथे भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
ही रॅली वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यांतील सर्व मराठा बांधवांसाठी असून, समाजातील युवक-युवती, महिला, माताभगिनी, शालेय विद्यार्थी यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महागणपती घाट येथून सुरू होणारी ही रॅली वाई शहरातून फेरी मारणार आहे, त्यानंतर रविवारी (29 ऑगस्ट) मुंबईला किती वाजता प्रस्थान करायचे याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
बैठकीत मराठा समाजाच्या विविध समस्यांवरही चर्चा झाली. विशेषतः कुणबी प्रमाणपत्र देण्यात होणारे अडथळे, बांधवांचे अडवणूक करून जास्त प्रमाणात पैसे उकळण्याचे प्रकार शासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांकडून होणारी अडवणूक याचाही समाचार घेणार असल्याचं मराठा बांधवांनी सुचित केलं, तसेच नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी यावर चिंता व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारांवर समाज स्तरावर लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. विशेषता मराठा समाजातील बांधवांनी राजकीय बेड्यांमध्ये न अडकता मराठा समाजासाठी एकत्र येण्याचे आव्हान ही या ठिकाणी करण्यात आले.
त्यामुळे सर्व स्तरातील मराठा बांधवांनी एकत्रित येऊन मराठा समाजाचे नेतृत्व करावे असेही या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने बोलण्यात आले. विशेषतः कॉलेज युवक-युवतींनी आपल्या भविष्यासाठी आंदोलनात पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणांनी कल्पतरू मंगल कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.
ही बैठक सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांच्या उभारलेल्या न्याय हक्कासाठीच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी ही रॅली व पुढील मोर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने, संपूर्ण मराठा समाजाने एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा