शिवसेना वाई विधानसभा प्रमुख विकास शिंदे यांच्या सौजन्याने माऊली ज्येष्ठ नागरिक संघटनेचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
माऊली ज्येष्ठ नागरिक संघटना, क्षेत्र धोम यांच्यासाठी शिवसेना वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष विकास अण्णा शिंदे यांनी स्वखर्चाने खास श्रावण यात्रेचे आयोजन केले. या यात्रेमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन व आदमापूर येथील श्री बाळूमामा यांचे दर्शन करण्यात आले.
या सहलीमध्ये ३५ ते ४० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. सहलीच्या गाडीचे पूजन विकास शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी शिवसेना वाई तालुका प्रमुख रवींद्र आप्पा भिलारे, दत्ता पोळ, सचिन वायदंडे, सोपान चिकणे, आणि गणेश साठे हे मान्यवरही उपस्थित होते.
या कार्यक्रमाची संकल्पना अशी होती की, श्रावण महिन्यात ज्येष्ठ नागरिकांनी धर्मिक स्थळांना भेट द्यावी, अशी एक इच्छा सामान्य कार्यकर्त्यांनी विकास अण्णा शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी ती तातडीने लक्षात घेतली आणि लगेच निर्णय घेत श्रावण यात्रेचे नियोजन केले.
ज्येष्ठ नागरिकांची चहा नाष्ट्याची तसेच भोजनाची विशेष सोय करण्यात आली होती पश्चिम भागातील सचिन मानकुंबरे यांच्या मानकुंबरे ट्रॅव्हल्सच्या बसने यात्रेकरू कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. संपूर्ण यात्रेदरम्यान सर्वांनी भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.
या उपक्रमामुळे विकास अण्णा शिंदे यांचे विविध स्तरांतील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा