वाई शहरात पाच ठिकाणी बसवले नवीन स्पीड ब्रेकर

योगेश फाळके यांच्या प्रयत्नांना यश - नागरिकांना दिलासा

Five new speed breaker in city, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई शहरातील रहदारी, वाढते अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  गुरवार दि. 7 ऑगस्ट रोजी वाई शहरात पाच ठिकाणी नवे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत. गांधी पेट्रोल पंपाजवळ, नगरपरिषद शाळा क्रमांक १० समोर, एसटी स्टँड समोर, सेंट थॉमस शाळेसमोर आणि चर्च समोर हे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले असून त्यामुळे रहदारीचा वेग नियंत्रित होईल आणि अपघातांची शक्यता कमी होणार आहे.

या उपक्रमामागे शिवसेना युवा सेना विधानसभा प्रमुख योगेश फाळके यांची सततची पाठपुरावा आणि प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. एम एस आर डी सी विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून, योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता पटवून दिल्यानंतर अखेर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामासाठी एन. पी. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे या संस्थेमार्फत स्पीड ब्रेकर बसवण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. 

योगेश फाळके यांनी सांगितले की, "शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांची काळजी हीच माझी प्राथमिकता आहे. अजूनही काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज आहे, यावरही लवकरच काम केले जाईल." नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत योगेश फाळके यांचे आभार मानले आहेत.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !