रविवार पेठ स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील केशवराव भालचंद्र घोटवडेकर सर ( वय ८९ वर्षे ) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन विवाहित मुली आणि दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. केशवराव घाटवडेकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या येथील द्रविड हायस्कूलमध्ये १९६९ ते ८६ पर्यंत मराठी इतिहास व भुगोल या विषयाचे शिक्षक म्हणून सेवा केली.
सेवानिवृत्तीनंतर शेतीमध्ये लक्ष घातले होते. डॉ.घोटवडेकर हॉस्पिटल आणि संचित आय.सी.यू चे डॉ विद्याधर घोटवडेकर युनिक मेडिकल डिस्ट्रीब्यूटर्सचे विक्रम घोटवडेकर यांचे वडील आणि माजी उपनगराध्यक्षा डॉ. मेधा घोटवडेकर यांचे सासरे होत. त्यांचेवर रविवार पेठ स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा