उत्सव शांततेत पार पाडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी, शुभम कोदे
वाई शहरात गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. या मंडळांचे सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्ते पारंपारिक असणारा हा गणेशोत्सव आप आपल्या बुद्धी कौशल्याचा पुरेपुर वापर करून वाई शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या मनोरंजना साठी राजकीय सामाजिक पौराणिक उत्तम प्रकारचे जिवंत देखावे सादर करत असतात हे देखावे सादर करत असताना मंडळांन मध्ये आकर्षक देखावे दिसण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. हा उत्सव शांततेत आणी भयमुक्त वातावरणात पार पडावा यासाठी वाई पोलिस स्टेशन मार्फत पोलिस संचलन करण्यात आले आले आहे. अशी माहिती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेले वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी डिवाय एसपी बाळासाहेब भालचिम आणी वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.
याच कालावधीत मुस्लिम समाजाचा ईद हा महत्त्वाचा सण देखील येत आहे .त्या दरम्यान सलोख्याचे वातावरण असणे गरजेचे आहे असेही आवाहन वरील दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांनी केले आहे . दोन्हीही सण हे पारंपरिक आहेत ते निष्कलंक साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षा वाईच्या पोलिस दला कडुन व्यक्त केली जात आहे.
दि.२१ ऑगस्ट रोजी वाई पोलीस ठाणे हद्दीमध्ये महागणपती घाट वाई या ठिकाणी गणेशोत्सव 2025 अनुषंगाने जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम सराव करण्यात आला सरावा दरम्यान सर्व अधिकारी,अंमलदार यांना दंगा काबू बाबत माहिती देण्यात आली तसेच सरावा दरम्यान १ गॅस सेल व १ हॅण्ड स्टॅन ग्रेनेट खर्च करण्यात आले आहे.तसेच सदर सराव दरम्यान , पोलीस ठाणे हद्दीमधील ५ शांतता समिती सदस्य, ७ पोलीस मित्र, १ कार्यकारी दंडाधिकारी हे देखील उपस्थित होते.
तसेच जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम पूर्ण झाल्या नंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाई शहरातील - महागणपती घाट - छत्रपती शिवाजी म.चौक - पोस्ट ऑफिस - नवीन पूल - किसनवीर चौक- जामा मशीद - चावडी चौक- दातार हॉस्पिटल नगरपालिका - शाहीर चौक - आमंत्रण चौक - पोलीस स्टेशन वाई असा रूट मार्च काढण्यात आला. तसेच सर्व अधिकारी अंमलदार यांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सव अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने योग्य त्या सूचना डिवाय एसपी बाळासाहेब भालचिम यांनी देऊन रूट मार्च संपन्न झाला.
रुटमार्च मध्ये वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम तसेच वाई पोलीस ठाणे कडील व भुईंज पाचगणी महाबळेश्वर मेढा पोलीस ठाण्याकडील ७ अधिकारी ३१ अंमलदार सर्व आवश्यक साहित्यासह हजर होते तसेच वाई नगरपालिकेचे अग्निशामक वाहन, ग्रामीण रुग्णालय वाई कडील ॲम्बुलन्स, व 2 शासकीय पोलीस वाहने असे उपस्थित होते.
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा