तीन जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यात डॉल्बीच्या गोंगाटावर वाई पोलिसांनी प्रथमच ठाम आणि धडाडीची कारवाई करत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 26 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास सोनगिरवाडी परिसरात घडली.
फिर्यादी पोलीस कर्मचारी प्रसाद बबन दुदुस्कर (वय 31, रा. पोलीस वसाहत, वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, प्रसाद सुरेश जाधव (रा. खानापूर ता. वाई), आकाश मुकुंद कांबळे (डिजे व्यवसायिक, रा. सोनगिरवाडी वाई) आणि कुणाल खरात (रा. सोनगिरवाडी, वाई) यांनी महिंद्रा ट्रॅक्टर (क्रमांक MH11CG 9764) वापरून सार्वजनिक ठिकाणी डॉल्बीच्या माध्यमातून कर्कश गाणी वाजवत शांतता भंग केली.
सार्वजनिक ठिकाणी उपद्रव व वाहतुकीस अडथळा
आरोपींनी ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध उभे करून, नागरीकांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण करत गंभीर सार्वजनिक उपद्रव केला. ही घटना नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाजवळ, बावधन नाका ते छत्रपती शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अनिवार्य – पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे
सदर कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस स्टेशनचे कर्मचारी हवालदार लेंभे यांनी केली. "सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कायद्याचे कडक पालन करूनच अशा प्रकारांना आळा घालणार असे वाई पोलीस ठाण्याचे पो.नि.जितेंद्र शहाणे यांनी सांगितले.
वाई तालुक्यात ही डॉल्बीविरोधात नोंदवलेली पहिली अधिकृत कारवाई असल्याने ज्येष्ठ नागरिक रुग्ण व नागरिकांतून पोलीस दलाच्या या कृतीचे स्वागत होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा