सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील श्री.भद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेस १९ लाख रुपये नफा झाला असून संस्थेस लेखापरीक्षणाचा ' ब ' वर्ग मिळाला आहे. यावर्षी संचालक मंडळाने सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब जमदाडे यांनी दिली.
लो.टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात झालेल्या संस्थेच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थापक संचालक दत्ता मर्ढेकर, उपाध्यक्ष चिंतामणि मेहेंदळे, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, मानद सचिव भद्रेश भाटे उपस्थित होते.
जमदाडे म्हणाले, संस्थेचे वसूल भागभांडवल ३१ लाख ३२ हजार ६५० रुपये असून ठेवी १० कोटी ९९ लाख १८ हजार रुपये आहेत. कर्ज वाटप ९ कोटी १० लाख रुपये तर गुंतवणूक ३ कोटी ९८ लाख रुपये केली आहे.
संस्थापक संचालक दत्ता मर्ढेकर यांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.ज्यांचे शंभर रुपयेचे शेअर आहेत त्यांनी किमान एक हजार रुपयेचे करावे तसेच चालु वर्षात संचालकाच्या मार्फत एक हजार मान्यवर नागरिकांना शेअर दिले जातील असे मर्ढेकर यांनी सांगितले.यावेळी व्यवस्थापिका संगीता बारटक्के यांनी मागील सभेचे इतिवृत्त, तसेच संचालक मंडळाचे सुचविलेली नफा वाटणी व लाभांश याबाबत माहिती दिली.
लिपिक सौ.मंजुळा मांढरे - शिंदे यांनी आर्थिक ताळेबंद व नफा तोटा पत्रक, कर्ज प्रमुख सतीश कर्णे यांनी संचालक व त्यांच्या नातेवाईकांच्या कर्जाची माहिती दिली. संचालिका मानसी पटवर्धन यांनी वैधानिक लेखा परीक्षक अहवाल वाचन केले.
याप्रसंगी वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल देव, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर,ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, आय. एम. ए.वाई शाखेचा वैद्यकीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. बाळासाहेब येलमार, डॉ.आनंदराव भोसले, सी. ए. चेतन कोदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. वाघचवरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनिल देव, सतीश कुलकर्णी, आनंदराव कांबळे, मानसिंगराव वाघ, संजय चौधरी, अनिल चव्हाण यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करताना मौलिक सूचना केल्या. संचालक विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. भद्रेश भाटे यांनी आभार मानले.
सभेस संचालिका मालती तांबे, रंजना चव्हाण, संचालक चंद्रशेखर ढवण, प्रीतम देव, कौशिक कान्हेरे तसेच बापूसाहेब सावंत,विवेक सुपेकर, अतुल भाटे, मंदार पटवर्धन, विठ्ठल भागवत, निवृत्ती सुर्यवंशी,भूषण बारटक्के, यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
---------------------
-------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा