संस्थेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांना संपूर्ण प्रशाले तर्फे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम प्रशालेच्या इयत्ता आठवी ब च्या वर्गाने पूर्णपणे आयोजित केलेला होता. यावेळी प्रशालेची विद्यार्थिनी स्नेहल मस्के हिने उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले. प्रशालेची विद्यार्थिनी दुर्वा कोळी हिने लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगितली तर कार्तिकी शिंदे हिने अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली. यावेळी प्रशालेच्या उपशिक्षिका हर्षदा परदेशी यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी प्रशालेचा विद्यार्थी लौकिक पाटील ,सार्थक शिर्के व श्रीयोग शिंदे या विद्यार्थ्यांनी सुंदर असे फलक लेखन करून अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या हुबेहूब प्रतिकृती फलकावर चित्रित केल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रशालेचा विद्यार्थी तुषार गंगावणे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे, अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ,ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे ,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














