३०जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपुर येथे शिवशाही न्युजच्या तिसऱ्या वर्धापनदिनी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
समाजसेवेचे व्रत घेवुन अहिल्यानगर पारनेर येथिल नारायणगव्हाण गावातील शरद भाऊसाहेब पवळे यांनी बालसंस्कार,व्यसनमुक्ती, दारूबंदी,वृक्षारोपण वृक्षसंवर्धन वनसंरक्षण, ग्राम एकता अभियान, सामाजिक कार्य करणाऱ्यांचा गौरव,गरजुंना दिवाळी भेट, नारायणगव्हाण चौपदरीकरण, कमांडमुक्त गाव लढा,बेरोजगारी,भुमिपुत्रांचा लढा, सुपा औद्योगिक वसाहतीत शेतकऱ्यांच्या भुखंडासाठी आंदोलन,जय कामगार चळवळ,जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे,पोपटराव पवार यांच्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग, सामाजिक प्रश्नांवर १२ उपोषणे,रास्ता रोको,टोलबंद आंदोलन,पेरू वाटप आंदेलने यांसह सामाजिक ,शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेकडो तालुका जिल्हा राज्यस्तरीय यशस्वी जनजागृती जनआंदोलने करत प्रश्नासकीय न्यायालयीन लढा यशस्वी करत राज्यातील शेतकऱ्यांच्या शिव पाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधत
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी करून सरकार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मोठी चळवळ उभारून छत्रपती संभाजीनगर येथिल मुंबई हायकोर्ट येथे शिव पाणंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर रिट पिटीशन दाखल करून ६० दिवसात शेतकऱ्यांना मोफत शेतरस्ते खुले करून देण्याचा यशस्वी न्यायालयीन संघर्ष लढा,अहिल्यानगर मधील भव्य पेरू वाटप आंदोलन, राज्यभर विविध जिल्हाधिकार्यालयावर पेरू वाटप आंदोलन करत राज्यातल्या विविध तालुक्यांमध्ये प्रभावी चळवळ उभारून राज्यात शेकडो प्रलंबित शिव पाणंद शेत रस्ते खुले करण्यात मोठे यश प्राप्त झाले असुन राज्यभर शिवपाणंद नाव पोहचवुन अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी शिव पाणंद चळवळीत निस्वार्थपणे योगदान देत असुन
आझाद मैदान येथे पुकारलेल्या आंदोलनानंतर राज्याच्या महसुलमंत्र्यांनी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करत विशेष शासणनिर्णय राज्यात मिळवण्यात चळवळीला मोठ यश मिळाले शिव पाणंद शेतरस्त्यांना मोफत पोलिस संरक्षण,मोफत मोजणी, शेतरस्त्यांची इतर हक्कात नोंद करणे,१२ फुटांचा शेतरस्ता या मागण्या पूर्ण लवकरच दगडी नंबरी लावणे, शेतरस्ता सपाटीकरण करण्यासाह शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणाचे आदेश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, विविध गावांमध्ये रोड मॉडेल व्हिलेजच्या माध्यमातून गावोगावी रोड मॉडेल व्हिलेजच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज करण्यासाठी पाठपुरावा करत राज्यभर मेळावे सुरू करून सामाजिक बांधिलकी जबाबदारी जपल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळेंना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवशाही न्युज चॅनलच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यस्तरीय शिवशाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
----------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
*
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा