दुचाकीस्वार जबर जखमी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई वाठार रोडवर शांतीनगर हद्दीत ट्रकने दुचाकीस्वरास पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी स्वार जखमी झाला आहे. ही घटना 26 जुलै दुपारी दोन तीन च्या सुमारास घडली.
मोहसीन नजीर जुदरे वय (35) रा. महाबळेश्वर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.
वाईहून जाणारा ट्रक क्र. एम एच 12 एलटी 0849 वाठार कडे जात होता, शांतीनगर येथे फॅशन प्रो या दुचाकीला धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसानी ती नंतर सुरळीत केली.
----------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
*
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा