सत्ताधारी पक्षात नाही म्हणून आम्हाला बोलायची संधी दिली जात नाही. मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही - आमदार अभिजीत पाटील

बागायतदारांच्या नुकसानीबाबत आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला

Losses of grape growers, mla abhijit patil, solapur, padharpur, Shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी) 

सोलापूर जिल्ह्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व माढा तालुक्यातील मानेगाव या परिसरातील द्राक्ष बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जवळपास २०,००० हेक्टर क्षेत्र या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले आहे. मात्र प्रशासनाने फक्त ३३ हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे केल्याचे गंभीर वास्तव आमदार अभिजीत आबा पाटील यांनी आज विधिमंडळात मांडले.

“सत्ताधारी पक्षात नाही म्हणून आम्हाला बोलायची संधी दिली जात नाही. मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही,” असा जोरदार आक्रमक सूर आमदार पाटील यांनी धरला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत त्यांनी शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले. त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून सरसकट मदत देण्याची मागणी केली.

या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आमदार पाटील यांनी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या अडचणींवर ठोस उपाययोजना झाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

  • द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान देण्यासाठी आ. अभिजित पाटील आक्रमक. 
  • विरोधक आमदारांना अधिवेशनात प्रश्न मांडू दिले जात नसल्याचाच केला थेट आरोप. 
  • तुटपुंजे द्राक्ष उत्पादकांनाच नुकसान भरपाई देण्याची सरकारची तयारी. 
  • आ. अभिजीत पाटील यांचे कडून जास्तीत जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीचांच जोर कायम

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !