आमदार शशिकात शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष
आमदार शशिकात शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. जयंत पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. पक्षाच्या राज्य अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानं शशिकांत शिंदे यांनी आनंद व्यक्त करत. आपली पुढील वाटचाल कशी असेल हे देखील स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण काम करणार असल्याचं त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
आमदार शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार आमदार नेते पदाधिकारी यांनी प्रदर्शन शशिकांत शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकारणात येणाऱ्या तरुणांना सोबत घेणार
पूर्वीच्या राजकारणाची आणि आजच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. पूर्वी जनतेचे प्रश्न मांडताना विरोधक आवाज उठवायचे आणि सत्ताबदल व्हायचा पण आता आमिष दाखवून आणि यंत्रणेचा उपयोग करुन सत्ताबदल केला जातो. त्यामुळं या बदलेल्या व्यवस्थेविरोधात जनजागृती करुन पक्षानं जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडताना महिन्याभरात राज्याचा दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. ज्या लोकांना राजकारणात चांगल्याप्रकारे समाजसेवा करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना सोबत घेऊन, विविध समाजातील, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन मी पक्ष संघटना मजबूत करेन. एक महिन्याचा दौरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबुतीनं उभं करण्यात निश्चितपणानं यश येईल.
आर आर पाटलांसारख काम करणार
शशिकांत शिंदे म्हणाले, "महाराष्ट्रातील अनेक प्रश्न तसंच अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेन. या काळात पक्ष संघटना वाढवत असताना ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेलच पण परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करेन, अशी आपल्याला ग्वाही देतो. पक्षात अनेक दिग्गज नेते अध्यक्षपदासाठी पात्र असतानाही मला जी संधी मिळाली, त्या संधीचं सोन करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन.
सामान्य कुटुंबातील व्यक्ती नेता कसा होतो हे आर. आर. पाटलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तशा पद्धतीचं काम करुन सर्वसामान्य माणसाच्या, जनतेच्या प्रश्नासाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत त्याविरोधात आवाज तर उठवेन. वेळ पडली तर रस्त्यावर उतरुन या सरकारच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनेतीच जागृती करेन अशी ग्वाही देतो"
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा