राज ठाकरे यांच्या माध्यमातून वकील संघाचा प्रश्न सोडवू - मनसे नेते दिलीप धोत्रे

तीन दिवसापासून उपोषण सुरू सरकारने मागण्या मान्य कराव्यात दिलीप धोत्रे यांच्या सरकारला सूचना

Raj Thackeray, Lawyers' Association, Dilip Dhotre, solapur, padharpur, Shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

पंढरपूर येथे बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके, ॲडव्होकेट शक्तिमान माने या दोघांनी वकील संरक्षण कायदा पारित व्हावा. यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट देऊन सर्व वकील बांधवांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ॲडव्होकेट  मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट  संदीप रणनवरे, ॲडव्होकेट  राजेश चौगुले इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत वकिलांवर प्राणघातक हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. काही घटनांमध्ये वकील दाम्पत्याचा खून झालेला असून अनेक वकिलांना गंभीर इजा झाली आहे. तरीही गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र शासन "एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट" लागू करण्यास टाळाटाळ करत आहे. याच निष्क्रियतेविरोधात पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण करणाऱ्यांमध्ये ॲड.प्रतापसिंह शेळके, ॲड. शक्तीमान माने आणि इतर वकील सहभागी झाले आहेत.

यामध्ये एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ लागू करावा.वकिलांवरील हल्ल्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने या प्रश्नावर सक्रिय पावले उचलावीत.वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे. या कायद्याच्या अभावामुळे वकिलांचे जीवन असुरक्षित झाले असून, सरकार व प्रशासन केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेत आहे.

याबाबत जर तातडीने पावले उचलली गेली नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप धारण करेल. असा इशारा पंढरपूर अधिवक्ता संघाने दिला आहे. या मागणीला मनसेने पाठिंबा दिल्याने लवकरच वकील बांधवांचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !