स्थानिक नागरिकांची होते आहे मोठी गैरसोय
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई जोर बलकवडी हे पावसाचे आगार असल्याकारणाने व तालुक्याच्या पश्चिम टोकावर वसलेल्या जोर गाव परिसरात शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक ओढ्यावर दगडी बांधकाम करून उभारलेला तात्पुरता पूल पूर्णतः वाहून गेला आहे. परिणामी, गावातील नागरिकांना कामधंदा, शिक्षण व दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पुलावरून दररोज अनेक विद्यार्थी नांदगणे शाळेत जात असतात. मात्र सध्या पूल आणि रस्ते तुटल्याने एसटी बससेवाही बंद झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत.
स्थानिक ग्रामस्थांची मागणी: स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून या भागासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या उद्भवत असून प्रवासात अडथळे निर्माण होतात.
हा रस्ता धोम-बलकवडी पाटबंधारे विभागाच्या आकातारीत असून, त्यांच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना दरवर्षी अशा संकटाचा सामना करावा लागतो, अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांचा ठाम आग्रह: वाहून गेलेल्या तात्पुरत्या पुलाच्या जागी आरसीसी पद्धतीने स्थायिक पूल बांधावा व नागरिकांना सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
----------------------------
----------------------------
----------------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा