प्रशालेचे तब्बल 28 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२४-२०२५निकाल नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला .यामध्ये प्रशालेचे तब्बल 28 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून त्यापैकी आरव विक्रम तांबे हा २८८ गुणांसह राज्यात पाचवा तर सातारा जिल्ह्यात प्रथम आला आहे . तर प्रिशा सुमुवेल गावित हीने २८८ गुणांसह राज्यात पाचवी तर जिल्हयात दुसरी येण्याचा मान मिळवला आहे . तर शुभम वर्णे , शुभ्रा मोरे ,यश साळुंखे ,वेदिका जाधव , ईशान फडतरे ,रुद्रप्रताप शिंदे , अथर्व सपकाळ , श्रीवेद मंचुके , देवराज आरडे ,सुहास करपे , वैष्णवी कदम , अर्णव शेलार , आयेशा कासुर्डे ,दक्ष महामुनी , स्वरा कोचळे ,स्वरा सूर्यवंशी ,सोहम येवले ,प्राची घाडगे ,वेदिकाराजे उदार , स्नेहल कचरे , वृंदा वाकडे ,आराध्य शिंदे ,स्वरा लोहार , स्वरा कदम , श्रवण जाधव, श्लोक काळे यांनी चमकदार कामगिरी करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे . प्रशालेचे वरिष्ठ मुख्याध्यापक विकास जाधव यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि संयोजनातून तसेच मार्गदर्शक शिक्षक सौ मनिषा माने , नवनाथ शिंदे , अपर्णा शिंदे , सौ रंजना गेडाम , सौ शोभा शिंदे यांच्या अथक परिश्रमातून हे ऐतिहासिक यश साकारले असून नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये टॅलेंट बॅच उपक्रमाचा परिपाक म्हणून गत अकरा वर्षांमध्ये २३८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रशालेने आपला आगळा ठसा उमटवला आहे .शिष्यवृत्ती तसेच इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून प्रशालेने गुणवत्तेचाआपला असा वेगळा आयाम निर्माण केला आहे त्याचा परिपाक म्हणजे दरवर्षी पटसंख्येचा आलेख चढता राहिला आहे .यावर्षी प्रशालेमध्ये बालवाडी सह इयत्ता पाचवी पर्यंत 1300 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत.महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका कार्यक्षेत्रातील एकाच शाळेचे 28 विद्यार्थी गुणवत्ताधारक असणारी राज्यातील एकमेव शाळा म्हणजे पी एम श्री नगरपालिका शाळा क्र.५ वाई.
या अभूतपूर्व यशाबद्दल वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे जननायक आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार मकरंद आबा पाटील , वाई नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष , अनिल सावंत , वाई नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सौ संजीवनी दळवी ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट वाईच्या तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी ,कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी , वाई नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर , वाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. हर्षवर्धन मोरे ,शिक्षणाधिकारी गोंदिया सुधीर महामुनी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ . निर्मला चोरगे , उपाध्यक्षा सौ .वैशाली शिंदे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय आप्पा लोळे ,माजी नगरसेवक प्रदीप दादा चोरगे .चरण गायकवाड , सौ .रूपाली वनारसे , सौ शितल शिंदे, माजी नगराध्यक्ष भूषण गायकवाड, अमर जमदाडे, माजी शिक्षण मंडळ सदस्य शैलेंद्र देवकुळे , माजी नगरसेवक दिलीप शिंदे , राजेंद्र कासार, रणवीर गायकवाड तसेच आजी-माजी नगरसेवक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य या सर्वांनी अभिनंदन केले .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा