कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी स्वतः घातले लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वेळे येथे महामार्गावर एवढा मोठा दरोडा कारवर पडला याबाबत जिल्हयाचे पालकमंत्री व मंत्री महोदय अधिवेशनात यावर चर्चा करणार का ?
वेळे येथे झालेल्या सोने व्यापा-याच्या दरोडा प्रकरणी एकजण अटकेत शुक्रवार दि. १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी या घटनास्थळाची आय जी सुनिल फुलारी यांच्या कडून तपासणी तर इतर उर्वरीत आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना झाल्याची माहिती तपास अधिकारी भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दिली.
याबाबत भुईंज पोलीसांच्या माहिती नुसार शनिवारी पहाटे महामार्गावर घाट उतरल्यानंतर वेळे गावा जवळ कामोठे मुंबई येथून विटा जिल्हा सांगली असा प्रवास करणारे सोन्याचे व्यापारी विशाल पोपट हसबे रा. हिवरे ता. खानापूर जिल्हा सांगली हे त्यांच्या व्हेनु कार नं. MH01 ER 9468 या कारला अज्ञात स्कॉरपिओ आणि इनोव्हा यांनी गाडी आडवी मारून त्यातील तीनजणांना मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या व त्यांचे अपहरण करून त्यांना सर्जापूर ता. जावली येथे नेहून सोडले व कार मधील २० लाख रूपयाची रोकड घेवून पसार झाले. या घटनेने संपुर्ण महामार्गासह राज्य हादरले होते. सोन्या चांदीचे व्यवसायात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थितीचे गांभिर्य ओळखून भुईज पोलीस व सांगली पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने यातील विनीत राधाकृष्णन वय ३० वर्षे रा. पन्नकड केरळ राज्य या संशयित आरोपीस ताब्यात घेवून त्यास भुईंज पोलीसांनी रविवारी अटक करून त्यास वाई न्यायालयात हजर केले असता त्याला शुकवार दिनांक १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि रमेश गर्जे यांनी दिली.
दरम्यान शनिवारच्या घटनेने जिल्हा पोलीस दल विशेषतः पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेव भालचिम यांच्या भेटीनंतर घटनास्थळी रात्री उशिरा कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी भेट देवून पुढील तपासासाठी सुचना दिल्या या तपासासाठी सर्व आरोपी हे विविध राज्यातील असल्याने विविध राज्यात पथके रवाना करण्यात आली आहेत असे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सांगितले.
पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावर वेळे ते आनेवाडी टोलनाका या दरम्यान वाढती गुन्हेगारी व लुटमार यांचा विचार करून जिल्हा पोलीस दलाने रात्रीचे फिरते विशेष पथक व यंत्रणा कार्यान्वित करावी वेळे गावानजीक पोलीसांची विशेष हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी महामार्गालगतच्या असणाऱ्या गावातून होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा