करमाळा पोलिसांचे मोठे यश - आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
अभिजीत जीवन सरडे वय वर्ष 27 राहणार कंदर तालुका करमाळा यांनी दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी करमाळा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती की कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहत्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून त्यांच्या घरातील सोने दागिने व रोख रक्कम घोरपडी करून चोरी केली आहे. चोरी झालेला प्रकार करमाळा पोलिसांचे लक्षात आल्याने त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला.
करमाळा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना सराईत गुन्हेगारांची चौकशी केली असता, रामेश्वर जंगल्या भोसले राहणार पांडे गवन तालुका आष्टी जिल्हा बीड यांने चोरी केल्याचे कबूल केले. करमाळा पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरी झालेले दागिन्यापैकी दीड लाख किमतीचे सोन्याची कर्णफुले व सोन्याची ठुशी असे मुद्देमाल हस्तगत केले आहे. आरोपीवरती यापूर्वीही अनेक गुन्हा दाखल आहेत.
करमाळा पोलीस ठाणे, कर्जत पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे, बिडकीन पोलीस ठाणे, राहुरी पोलीस ठाणे, अष्टी पोलीस ठाणे, या सर्व पोलीस ठाण्यामध्ये या व्यक्तीवर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, करमाळा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, गिरीजा मस्के, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, हवालदार अजित उबाळे, वैभव ठेंगील, मनीष पवार, सोमनाथ गावडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश येवले, मिलिंद अर्जुन गोसावी, अमोल रणदिल, रविराज गटकुळ, अंगुली मुद्रा विभागाचे पोलीस गळवे व वेंकटेश मोरे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा